धक्कादायक… बीडमध्ये रविवारी सहा तर आठवड्यात 19 कोरोना मृत्यू; माजलगावची चिंता वाढली.

बीड दि.9 अॉगस्ट – राज्यात एकीकडे कोरोना रूग्णांची (Corona patients) संख्या कमी होत असताना बीड जिल्ह्यामध्ये मात्र दुसरी लाट अजूनही कायम आहे. रोज दोनशेच्या पुढे रूग्णसंख्या सापडत असताना आता मृत्युचा आकडाही हळूहळू वाढू लागला आहे. रविवारी तब्बल सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू (Corona death) झाला आहे. मृत्युचा हा आकडा जिल्ह्याची चिंता वाढवणारा आहे.

(Shocking … six corona deaths in Beed on Sunday and 19 in a week; Majalgaon’s anxiety increased.)

दरम्यान, बीड (Beed) जिल्ह्यात आठवड्यात 19 कोरोना बाधितांचा (Corona Positive) मृत्यू झाला असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना संसर्ग (Corona infection) अद्याप कमी झालेला नसुन अजूनही बाधितांची संख्या दोनशेवर येत आहे. जिल्ह्यात बीडसह आष्टी तालुक्यात बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. एकीकडे राज्यात निर्बंध (restrictions) शिथिल होवून जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असताना बीड जिल्ह्याचा संसर्ग (infection) मात्र आटोक्यात येत नसल्याचे दिसत आहे.

आरोग्य विभागाकडून दररोज कोरोना चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले तशी बाधितांची संख्याही वाढत आहे. रविवारी माजलगाव तालुक्यात 31 नविन कोरोना बाधित आढळून आल्याने माजलगाव तालुक्याची चिंता वाढली आहे. माजलगाव तालुक्यातील दूब्बा मांजरा या गावात एकाच दिवशी तब्बल 27 रुग्ण आढळून आले. माजलगाव तालुक्यातील बाधितांची संख्या बऱ्यापैकी कमी झालेली असताना अचानक झालेल्या वाढीमुळे आरोग्य प्रशासनासमोर आव्हान उभे राहिले आहे.

बीड जिल्ह्यामध्ये शनिवारच्या अहवालात 151 तर रविवारच्या अहवालात 216 कोरोना बाधित आढळून आली आहेत. रविवारी जिल्ह्यात अंबाजोगाई 9, आष्टी 70, बीड 31, गेवराई 18, केज 12, माजलगाव 31, परळी 3, धारूर 3, पाटोदा 21, शिरूर 9, वडवणी 9 अशी रूग्णसंख्या आहे. दिवसभरामध्ये 157 जणांना डिस्चार्ज देण्यात आला तर चिंताजनक बाब म्हणजे उपचार घेत असलेल्या सहा कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रविवारी झालेल्या मृत्यूचा आकडा सर्वात मोठा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!