धक्कादायक … अभ्यासासाठी मोबाईल नसल्याने गुणवंत विद्यार्थिनीची आत्महत्या.

नांदेड दि.19 जून – दहावीत 75 टक्के गुण मिळविल्यानंतर बारावीत आणखी चांगले यश मिळविण्यासाठी काही दिवस मैत्रिणींच्या मोबाईल वरून ऑनलाइन (Online) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थिनीने वडिलांना मोबाईल (Mobile) घेऊन देण्याचा हट्ट केला. परंतु मजुरी करणाऱ्या वडिलांची मोबाईल घेण्याची ऐपत नव्हती. त्यामुळे हताश झालेल्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केली.
(Shocking … Suicide of a meritorious student for not having a mobile for study.)
नांदेड (Nanded) जिल्ह्यातील नायगांव शहरातील ही दुर्दैवी घटना आहे. सतरा वर्षीय बुद्धीशी पोटफोडे असे मयत तरुणीचे नाव आहे. दहावीला 75 टक्के मार्क मिळवणाऱ्या बुद्धिशीला बारावीच्या परीक्षेसाठी अभ्यास करायचा होता, त्यासाठी तिने मोबाईलचा हट्ट धरला होता.
मात्र मजुरी करणारे तिचे वडील प्रकाश पोटफोडे हे तिला मोबाईल (Mobile) घेऊन देऊ शकले नाहीत. त्यामुळे हताश झालेल्या गुणवान तरुणीने गळफास घेऊन (suicide) जीवन संपवले. एकीकडे दहावी बारावीची परीक्षाच होत नसल्याने विद्यार्थी या टोकाला जाऊन का निर्णय घेतात असा प्रश्न उपस्थित होतोय.
परिस्थितीचा बळी…
गेल्या शैक्षणिक वर्षापासून कोरोना संकटाला तोंड देत अनेक विद्यार्थी अॉनलाईन (Online) अभ्यास करत आहेत. मात्र या अॉनलाईनसाठी आवश्यक अँन्ड्राॕईड मोबाईल अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी मोठी अडचण बनलेली आहे. परिस्थितीला तोंड देत अनेक जणांनी मात केली तर अनेक विद्यार्थी टोकाची भुमिका घेत असल्याचे दिसुन येत आहे.