धक्कादायक… एकाच कुटूंबातील तिघीनां सर्पदंश; दोन मुलींचा मृत्यू, आई अस्वस्थ… केज तालुक्यातील दुर्दैवी घटना.

केज दि.7 सप्टेंबर – झोपेत असताना दोन चिमुकल्या मुलींसह आईला सर्पदंश (Snake bite) होवून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून आईवर अंबाजोगाई (Ambajogai) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदरील घटना केज (Kaij) तालुक्यातील सोनेसांगवी येथे घडली. यामुळे गावात शोककळा पसरली आहे.
(Shocking… three snake bites in the same family; Death of two daughters, mother unwell … unfortunate incident in Kaij taluka.)
दि.7 मंगळवारी रात्री दैनंदिनी प्रमाणे रात्री सोनेसांगवी येथील दिपक साखरे आपल्या पत्नी जयश्री साखरे व 5 व 3 वर्षाच्या दोन मुलींसह घरात झोपी गेले होते. रात्री 11 ते 12 च्या दरम्यान पत्नी जयश्री व मुलींना सर्पदंश झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तात्काळ इतरांच्या मदतीने तिघींना अंबाजोगाई येथील स्वा.रा.ति. (SRTR) रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दोन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू (death) झाला असून जयश्री यांच्यावर उपचार सुरु आहेत. सदरील माहिती गावात कळताच शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.