50 हजार रुपयांच्या अनुदानासाठी बीडमध्ये धक्कादायक प्रकार; मृत महिलेचा पती असल्याचा तिघांनी केला दावा.

बीड दि.18 फेब्रुवारी – बीड ( Beed ) येथील एका महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर तीन जणांनी 50 हजारांसाठी आपण मृत महिलेचा पती असल्याचा दावा ठोकला आहे. एकाच महिलेचा पती म्हणून तीन जणांनी केलेले अर्ज पाहून प्रशासनाला देखील धक्का बसला आहे.

गेली दोन ते अडीच वर्षांपासुन संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूनं थैमान ( Corona pandemic ) घातलेलं आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली ( Corona patients death ) आहेत. घरातील कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानं अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

अशा निराधार कुटुंबीयांना आर्थिक मदत ( financial help ) करण्यासाठी सरकारकडून 50 हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान दिले जात आहे. यासाठी राज्यभरातून अर्ज मागवले जात आहेत. पण सरकारकडून मिळणारं हे अनुदान लुबाडण्यासाठी अनेकजण विविध क्लुप्त्या लढवताना दिसत आहेत.

कोरोनामुळे आपल्या नातेवाईकाचं निधन झालेलं नसतानाही अनुदान मिळवण्यासाठी अनेकजण अर्ज करत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं आहे. बीडमध्ये तर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका महिलेचा कोरोनानं मृत्यू झाल्यानंतर तीन जणांनी 50 हजारांसाठी आपण मृत महिलेचा पती असल्याचा दावा ठोकला आहे.

एकाच महिलेचा पती म्हणून तीन जणांनी केलेले अर्ज पाहून प्रशासनाला देखील धक्का बसला आहे. नावातील फरक आणि नाते जुळत नसल्याच्या कारणामुळे प्रशासनाने हे अर्ज नाकारले आहेत. पण 50 हजार रुपये मिळवण्यासाठी तिघांनी केलेला कांड पाहून प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. त्यामुळे कागदपत्रांची कसून छाननी सुरू करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यानंतरच अर्ज स्वीकारले जात आहेत.

आतापर्यंत बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या ( Corona Virus ) संसर्गामुळे 2 हजार 968 जणांचा मृत्यू झाला आहे. शासनाने मृतांच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचा सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा नुकतीच केली आहे. हे अनुदान मिळवण्यासाठी आतापर्यंत 3 हजार 326 अर्ज प्राप्त झाले आहेत.

बीड जिल्ह्याचा मृतांचा आकडा 2 हजार 968 आहे. तर आलेले अर्ज 3 हजार 326 आहेत. यातील 2 हजार 117 अर्ज बरोबर असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. संबंधितांना अनुदान मंजूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.

( Shocking type in Beed for a grant of Rs 50,000; The trio claimed to be the husband of the deceased woman. )

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!