बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची मेहुण्यांनीच केली हत्या; चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

लातूर दि.1 मार्च – बहिणीला त्रास देणाऱ्या भाऊजींची मेहुण्यांनीच हत्या (Murder) केली. लातूर शहरातील नवीन एमआयडीसी (MIDC) भागात ही घटना घडली आहे.
( Sisters-in-law kill sister-in-law for harassing sister; Four accused in police custody. )
बहिणीला भाऊजी (Brother in law) त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. दोघा मेहुण्यांसह त्यांच्या आणखी दोन साथीदारांनीही मारहाण केल्याचा आरोप आहे.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात (MIDC Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
काय आहे प्रकरण?
बहिणीला त्रास दिल्याचा राग आल्याने मेहुण्यांनीच भाऊजींची हत्या (Murder) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लातूर (Latur) शहरातील नवीन एमआयडीसी भागात ही घटना घडली आहे.
नेमकं काय घडलं?
बहिणीला भाऊजी त्रास देत असल्याच्या कारणावरून दोन मेव्हुणे पती-पत्नीच्या भांडणात पडले. त्यानंतर दोघांनी भाऊजींना लाकडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत विजयकुमार पिल्ले (वय 37 वर्ष) जखमी झाले होते. विजयकुमार यांना दवाखान्यात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
या घटने प्रकरणी एमआयडीसी पोलिसात आरोपी मेव्हुणे गणेश चटनाळे (वय 23 वर्ष), बसवराज चटनाळे (वय 32 वर्ष) यांचे साथीदार ओंकार धोत्रे (वय 20 वर्ष), शहानवाज पठाण (वय 21 वर्ष) या चौघांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी चारही आरोपींना ताब्यात ( Police Custody ) घेतले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.