समाजपयोगी उपक्रम काळाची गरज : सरपंच दादाराव काळे
पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी शिबीर

नेकनूर – दि.2 जानेवारी -वाढदिवस म्हटलं की पैशाचा अपव्यय असेच चित्र सध्यातरी दिसून येत आहे . अशा काळात नेत्र तपासणी , शस्त्रक्रिया यासारखे समाजपयोगी उपक्रम काळाची गरज बनली आहे याचा गोरगरिबांना लाभ होतो . त्यासाठी आणखीन अशा उपक्रमांचे आयोजन व्हावे , असे मत नेकनूर चे सरपंच दादाराव काळे यांनी केले .
पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नेकनूर ( ता . बीड ) येथील शासकीय रुग्णालयात आयोजित नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे शुक्रवारी ( दि .२) उद्घाटन झाले . याप्रसंगी दादाराव काळे हे बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह भ प नाना महाराज कदम हे होते . तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच दादाराव काळे , चाकरवाडी पोलीस पाटील नानासाहेब काकडे , डॉ गणेश ढवळे हे उपस्थित होते .
यावेळी नाना महाराज कदम म्हणाले की नेकनूरच्या रुग्णालयात रक्तदान , सर्वरोग निदान शिबिर , स्त्रियांच्या आजारावरील शिबिर अशी शिबिरे यापूर्वी आयोजित करण्यात आली होते . परंतु , नेत्र तपासणीसारखं शिबिर गेल्या तीन चार वर्षापासून पत्रकार अशोक शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राबवून सर्वसामान्य रुग्णावर उपचार करून वाढदिवसाचा उत्सव साजरा करण्याचे कार्य आयोजित करण्यात येत असल्याने अनेकांनी वाढदिवसाच्या निमित्ताने अशा प्रकारचे आदर्श उपक्रम राबविण्याची गरज निर्माण झाली आहे.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य सतीश मुळे , डॉ मुख्तार सर , डॉ शिवनीकर , डॉ विलास हजारे , पत्रकार सुरेश जाधव , मनोज गव्हाणे , अशोक काळकुटे , रवींद्र काळे , रामनाथ घोडके , आदिल भाई , प्रशांत भोसले , दत्ता आवारे , राजू शिंदे गणेश शिंदे आदींची उपस्थिती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जगदीश शिंदे सर यांनी केले . तर पत्रकार अशोक शिंदे यांनी आभार मानले . यावेळी ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
दोनशे रुग्णांची केली तपासणी २० रूग्णांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रिया- शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली असून २० रुग्णांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार आहेत . नेत्र तपासणी शिबिरात डॉ . गोपाळघरे मॅडम यांच्यासह टीमचे मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल त्यांचेही पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराने आभार मानले आहेत .
नेत्र तपासणी शिबीर हा आदर्श उपक्रम : नाना महाराज कदम – वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता पत्रकार अशोक शिंदे यांच्या मित्र परिवाराने नेत्र तपासणी व शस्त्रक्रियेसारखा आदर्श उपक्रम राबवत उपचाराच्या माध्यमातून वाढदिवसाचा उत्सव साजरा केला असल्याचे मत या वेळी ह भ प नाना महाराज कदम यांनी सांगून या उपक्रमाबद्दल पत्रकार अशोक शिंदे मित्र परिवाराचे कौतूक केले .
सामाजिक उपक्रमांच्या शिबिराला आडकाठी आणणे दुर्दैवी – मध्यंतरी कोरोना लसीकरण करताना सर्वच पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठाले बॅनर लाऊन आपली जाहीरात करवुन घेतली, लस शासनाची आणि जाहीरात लोकप्रतिनिधींची यावर मात्र पत्रकार महोदयांनी भरपुर बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत मात्र पत्रकार यांना मान-सन्मान का नको असाही प्रश्न पडतो एकंदरीतच वैयक्तिक मतभेदातुन असा सामाजिक उपक्रम राबविण्यात येऊ नये असे लेखी निवेदन देणारा पत्रकार माझ्यातरी पाहण्यात पहिलाच… असो…लोक काय म्हणतिल याचा विचार न केलेलाच बरा..- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर