सोनपेठच्या घटनेने परभणी जिल्हा हादरला; पिडीत मुलीचा दुर्दैवी मृत्यू.

परभणी दि.21 सप्टेंबर – परभणी (Parbhani) जिल्ह्यातील सोनपेठ येथे एका अल्पवयीन मुलीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार (gang rape) केल्याची घटना समोर आली. यातील पिडीत मुलीने विष प्राशन करुन आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. उपचारा दरम्यान तिचे निधन झाले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीत दोन अल्पवयीनांचा समावेश आहे. या प्रकरणामुळे परभणी जिल्हा हादरुन गेला आहे.

(Sonpeth incident shook Parbhani district; The unfortunate death of the victim.)

पोलिसांकडून (Police) मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि.12 सप्टेंबर रोजी घडली होती. जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यामध्ये अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीवर तीन जणांनी बलात्कार (Rape) केला होता. सोनपेठ तालुक्यातील 16 वर्षीय मुलीवर त्याच परिसरातील तीन मुले मागील दोन वर्षापासून त्रास देत होते. त्यात 12 सप्टेंबर रोजी त्यांनी संबंधित मुलीला तालुक्यातील डिघोळ तांडा परिसरात बोलावून तिच्यावर अत्याचार केले. पीडित मुलीने घरी आपल्यावर झालेल्या अत्याचाराची हकीकत कुटुंबीयांना सांगितलं. तेव्हा सर्वांना एकच हादरा बसला.

नातेवाईकांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणानंतर आपल्यासोबत घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी अस्वस्थ होती. त्यामुळे पीडित मुलीने विष प्राशन करून आत्महत्या (committed suicide) करण्याचा प्रयत्न केला.

तिला तातडीने उपचारासाठी अंबाजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तिला लातूरला हलविण्याचा सल्ला दिला. मुलीवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. पिडीत मुलगी जबाब देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हती.

तिच्या नातेवाईकांनी, सोनपेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार (complaint) पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर अन्य एक आरोपी फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. मात्र, मुलीचा उपचारा दरम्यान लातूर (Latur) येथे मृत्यू झाला आहे. पीडित मुलीचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला आहे. आरोपी नराधमांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!