बुधवार पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर; राज्यभरातील डेपोतील कर्मचारी करणार बेमुदत आमरण उपोषण.

मुंबई दि.26 अॉक्टोंबर – आज राज्यभरात एसटी बस (ST Bus) प्रवास महागला असताना परिवहन विभागासमोर (State Transport Department) आता कर्मचाऱ्यांनी संपाची भुमिका घेतल्यामुळे संकट निर्माण झाले आहे. सर्व संघटना मिळून उद्या दि.27 बुधवार पासून विविध मागण्यासांठी एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याचे जाहिर करण्यात आले आहे. या संपात राज्यातील सर्व डेपो मधील कर्मचारी आमरण उपोषणात सहभागी होणार आहेत.

(ST workers on indefinite strike from Wednesday; Depot workers across the state will go on an indefinite hunger strike.)

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्ता, घरभाडे, वार्षिक वेतनवाढीच्या दराबद्दल कोणताही ठोस निर्णय घेतला नाही, फक्त 5 टक्के महागाई भत्ता (DA) दिल्याने राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सर्व संघटना मिळून तयार करण्यात आलेल्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून बुधवार पासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर (Indefinite strike) जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर शासनाप्रमाणे लागू करून थकबाकीची रक्कम एक रकमी दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित होते. मात्र, राज्य सरकारने दिवाळी गोड करण्याऐवजी कडू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रलंबित मागण्यांवर सरकार गंभीर होत नसून, शासनाच्या धोरणाच्या विरोधात एसटीतील सर्व संघटना एकत्र आल्या आहेत. यानुसार राज्यभरातील डेपो, आगार पातळीवरील सर्व एसटी कर्मचारी बेमुदत आमरण उपोषणात (Fast unto death) सहभागी होणार असून, या सर्व संघटनांचे पदाधिकारी मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयात उपोषणाला बसणार आहेत.

परिवहन मंत्र्यांनी दिवाळीपूर्वी महागाई भत्त्यात केवळ 5 टक्के दिलेली वाढ अत्यल्प आहे यामध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलभूत गरजा भागू शकत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या झालेल्या आत्महत्या (Suicide) व अत्यल्प पगार, कामगारांचा प्रचंड असंतोष याबाबींचा विचार करून शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा (Annual increment) दर तसेच थकबाकीची रक्कम एकरकमी दिवाळीपूर्वी द्यावी याबाबत शासनाने फेरविचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी संयुक्त कृती समितीकडून केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!