चार दिवसांपासून दिलासा; आज २४ स्वॅबची प्रतिक्षा

बीड;- जिल्ह्यात गेल्या चार दिवसात निरंक असलेल्या जिल्हयातील आज एकूण २४ व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. कालच्या अहवालात उस्मानाबादच्या एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. बीड जिल्ह्याला चार दिवसात दिलासादायक स्थिती असताना आजच्या २४ अहवालाकडे लक्ष लागून आहे.
कोविड-१९ च्या निश्चित निदानासाठी बीड जिल्ह्यातील खाली दर्शविल्याप्रमाणे थ्रोट स्वॅब स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील विविध तालुकानिहाय पाठविण्यात आलेल्या स्वॅबची माहिती पुढील प्रमाणे आहे.
१) जिल्हा सामान्य रुग्णालय बीड 05
2) CCC बीड 02
3) उपजिल्हा रुग्णालय,गेवराई 01
4) उपजिल्हा रुग्णालय केज 02
5)उपजिल्हा रुग्णालय परळी 02
6) C CCआंबोजोगाई 01
7)स्वाराती ग्रा वै महाविद्यालय आंबाजोगाई 06
8)ग्रामीण रुग्णालय ,आष्टी 05
*एकूण बीड जिल्हा 24*