माझं गाव

विद्यार्थी प्रिय शिक्षिका माधुरी कुंभार यांचे निधन; सरस्वती विद्यालयात होत्या कार्यरत.

किल्ले धारुर दि.25 मे – धारुर येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका माधुरी रामदास कुंभार (वय 45) वर्षे यांचे आज बुधवारी (दि.25) रोजी पुण्यातील खाजगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या गुरुवारी नांदूरघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धारुर शहरातील श्री ज्ञानप्रसारक शिक्षण मंडळ संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयात माधुरी रामदास कुंभार गेली अठरा वर्षांपासुन इंग्रजी विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. इंग्रजी विषयात निष्णात असलेल्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणुन त्या परीचित होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगाने ग्रस्त होत्या.

माधुरी कुंभार यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचे आज निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर त्यांच्या मुळ गावी नांदुरघाट ता.केज येथे गुरुवार (दि.26) रोजी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती रामदास व एक मुलगा आहे. त्यांच्या अत्यंत कमी वयात झालेल्या अकाली निधनामुळे धारुर शहरात शैक्षणिक क्षेत्रात व विद्यार्थी, पालकात हळहळ व्यक्त होत आहे.

( Student Dear Teacher Madhuri Kumbhar passes away; Saraswati was working in the school. )

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!