घात अपघात

Suicide धारुर घाटात तरुणाची आत्महत्या

69 / 100 SEO Score

किल्लेधारुर दि.18 सप्टेंबर – Suicide शहराजवळच असलेल्या घाटात दि.१८ बुधवार रोजी सांयकाळी एका पस्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

धारुर शहराजवळ असलेल्या घाटात एका झाडाला सांयकाळी पाचव्या सुमारास तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. खबरीवरुन पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. प्राथमिक माहितीनुसार मयत तरुणाचे नाव ज्योतिराम सखाराम मंत्रे (वय 35) असून कचारवाडी येथील रहिवासी असल्याचे कळते. प्रेत ताब्यात घेवून धारुर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नसुन अधिक तपास पोलिस करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!