माझं गाव

धारुर ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्याची आत्महत्या; पोलिस घटनास्थळी दाखल.

किल्लेधारूर दि.25 सप्टेंबर – शहरातील ग्रामीण रुग्णालयात एका 35 वर्षीय कर्मचाऱ्याने रात्री गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केल्याचे सकाळी उघडकीस आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत.

(Suicide at Dharur Rural Hospital; Police arrived at the scene.)

धारुर (Dharur) शहरातील ग्रामीण रुग्णालयात (Rural Hospital) असलेल्या 108 रुग्णवाहिकेच्या (Ambulance) चालकाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सदरील चालक (driver) हा रुग्णालय परिसरात असलेल्या कर्मचारी निवासस्थानी (Staff residence) राहत होता. सध्या घरी एकटाच असून रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली.

खोलेश्वर बाबूराव निर्मळ (वय 35) असे मयताचे नाव आहे. घटनेचे माहिती पोलिसांना (Police) देण्यात आली असून घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मयत रुग्णवाहिका चालक हा गेल्या सहा वर्षांपासुन कंत्राटी पध्दतीवर काम करत होता अशी माहिती कळते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!