माझं गाव

धारुर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी आत्महत्या…

46 / 100

आंबेवडगाव येथे २३ वर्षीय तरुणाची आत्महत्या.

किल्लेधारूर दि.१५(वार्ताहर) धारूर तालुक्यात सलग तिसऱ्या दिवशी आत्महत्येची घटना घडली आहे. आंबेवडगाव येथे एका २३ तरुणाने आज दि.१५ मंगळवार रोजी पहाटेच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केली. रोहिदास हरिचंद्र नायकोडे असे मृत तरुणाचे नाव आहे. सलग तिसऱ्या दिवशी तालुक्यात आत्महत्येची घटना घडली.

सोमवारी कासारी बोडखा येथे १० वर्षीय बालकाच्या आत्महत्येनंतर मंगळवारी आसरडोह येथील शिक्षकाने गळफास घेतल्याची घटना ताजी असतानाच आज सलग तिसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजताच्या सुमारास अंबेवडगाव ता.धारुर येथे तरुणाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide) केल्याचे उघडकीस आले. रोहिदास हरिचंद्र नायकोडे असे मृत तरुणाचे नाव असून सदर तरुण होतकरू आणि कष्टाळू मेहनती शांत संयमी स्वभावाचा होता. त्याने टोकाचे पावूल उचलल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी (Police) पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी धारूर (Dharur) ग्रामीण रुणालयात पाठवण्यात आले आहे. मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही . त्याच्या पश्चात आई, वडील, तिन बहिणी, एक भाऊ असा परिवार आहे .

(Suicide in Dharur taluk for the third day in a row...)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!