माझं गाव

धारुर तालुक्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाची आत्महत्या ; लातूर येथील घटना.

50 / 100

किल्लेधारूर दि.31 अॉगस्ट – धारुर तालुक्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अतिशय गरीब कुटूंबातील अत्यंत हुशार विद्यार्थ्यांने उचललेल्या टोकाच्या भुमिकेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
( Suicide of a medical student in Dharur taluka; Incident at Latur. )

धारुर (Dharur) तालुक्यातील देवदहीफळ येथील रहिवासी भागवत सुनील बडे हा मुलगा लातूर येथे एमबीबीएसच्या (MBBS) तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता. काल दि.30 मंगळवारी गावाकडून तो लातूरला (Latur) गेला. संध्याकाळी 6 च्या दरम्यान भागवत बडे याने हॉस्टेलमध्ये (Hostel) रुममधील पंख्याला गळफास घेवून आत्महत्या (Suicide) केली. घटनेची माहिती कुटूंबियांना मिळताच नातेवाईकांनी लातूर येथे धाव घेतली. लातूर येथे त्याच्या पार्थिवावर आज शवविच्छेदन करण्यात येणार आहेत.

मयत मुलाचे वडील सुनील बडे हे शेतकरी आहेत. अत्यंत हुशार व स्वभावाने मनमोकळा असलेल्या भागवतने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे गावात शोककळा पसरली आहे. भागवत बडे याचे शिक्षण दिंद्रुड येथे झाले असून शासकीय कोट्यातून त्याचा एमबीबीएस या वैद्यकीय शिक्षणासाठी (medical student) निवड झाली होती. कुटूंबाची परिस्थिती जेमतेम असून भागवतच्या अकाली जाण्याने कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शुक्रवारीच औरंगाबाद (Aurangabad) येथे देवगिरी महाविद्यालयाच्या वसतिगृहात बी.कॉमचे शिक्षण घेणाऱ्या घनसांगवी जि.जालना येथील आरती सर्जेराव कोल्हे या 20 वर्षीय विद्यार्थिनीने शालच्या साहाय्याने गळफास घेउन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!