धारुर तालुक्यातील विद्यार्थीप्रिय शिक्षकाची आत्महत्या…. गावात हळहळ

किल्लेधारूर: दि.२१(प्रतिनिधी)- धारुर तालुक्यातील पिंपरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे विद्यार्थीप्रिय आदर्श शिक्षक मनोज कुमार पोटभरे या शिक्षकाने दि.२० शनिवार रोजी अंबाजोगाई येथील राहत्या घरी कौटुंबिक कलहातून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे पिंपरवाडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

(Suicide of a student-friendly teacher in Dharur taluka)

तालुक्यातील पिंपरवाडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कार्यरत असलेले मनोज कुमार पोटभरे हे अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. इंग्रजी विषयांमध्ये त्यांचे प्रभुत्व होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात निष्णात करण्यात त्याचा हातखंडा होता. अतिशय शांत, संयमी आणि एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांची धारूर तालुक्यांमध्ये ख्याती होती.

परंतु त्यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्या केल्याचे धारूर तालुक्यात समजताच सर्वत्र शोककळा पसरली आहे. तर एका आदर्श शिक्षकाला आज धारूर तालुक्याने गमावला. त्यांच्यावर अंबाजोगाई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, बहीण, पत्नी दोन मुले, असा परिवार आहे. पिंपरवाडा गावचे माजी सरपंच परमेश्वर तिडके यांनी पोटभरे यांच्या अकाली निधनाने गावाच्या शैक्षणिक क्षेत्रात न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पिंपरवाडा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
(Suicide of a student-friendly teacher in Dharur taluka)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!