आत्महत्या … बीडमध्ये उभ्या बसला तर केजमध्ये झाडाला गळफास घेवून दोघांची आत्महत्या.

बीड दि.15 मार्च – बीड (Beed) जिल्ह्यात दोघांनी आज दि.15 मंगळवारी गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. बीड बस स्थानकात एका 60 वर्षीय वृध्दाने बसमध्ये तर केज तालुक्यात एका 45 वर्षीय इसमाने झाडाला गळफास घेतला आहे.

( Suicide … while sitting in Beed, while in a cage, they committed suicide by hanging from a tree. )

केज (Kaij) तालुक्यातील मस्साजोग येथील आंबे नावाच्या शिवारात 45 वर्षीय विवाहित तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. ही घटना आज (दि.15) मंगळवारी दुपारी घडली. दत्तात्रय लक्ष्मण गायकवाड असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नांव आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी, केज तालुक्यातील मस्साजोग येथील दत्तात्रय गायकवाड या तरुणाने मस्साजोग शिवारातील आंबे नावाने ओळखल्या जात असलेल्या शेत शिवारात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या आत्महत्येचे अद्याप कारण समजू शकलेले नाही. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुंडे करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना बीड बस स्थानकात घडली. बीडमध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये अज्ञात कारणाने एका 60 वर्षीय वृध्दाने आज दुपारी बीड बसस्थानकात एम. एच.14 बी.टी. 2237 या एसटी बसमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

बीड बसस्थानकात संपामुळे उभ्या असलेल्या एका बसमध्ये निवृत्ती भागुजी आबुज (वय 60) रा.शाहुनगर, बीड या व्यक्तीने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना दुपारी उघडकीस आली. शिवाजीनगर पोलीसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शव ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. एसटी आगार प्रमुख ( Manager ) यांनी सदरील व्यक्ती हा एसटी कर्मचारी नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस (Police) पुढील तपास करत आहेत.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!