माजलगावात शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यासह पुरवठा अधिकारी ए.सी.बी. च्या जाळ्यात.

माजलगाव दि.31 डिसेंबर – मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करावी असा अर्ज देऊन त्यामध्ये पैश्याची तडजोड करून ते पैसे स्वीकारत असताना शेतकरी संघटनेचे अशोक नरवडे व मध्यस्थी करणाऱ्या पुरवठा अधिकारी एस. टी. कुंभार यांना लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहात पकडले.

(Supply Officer ACB along with office bearers of farmers association in Majalgaon. In the net of.)

माजलगाव (Majalgoan) तहसील कार्यालयात कार्यरत असणाऱ्या एका मंडळ अधिकाऱ्याची चौकशी करण्यात यावी अशी तक्रार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक नरवडे याने तहसील कार्यालय याठिकाणी दिली होती. त्याची चौकशी पुरवठा अधिकारी (Supply officer) असलेले एस.टी. कुंभार यांच्याकडे होती.

या प्रकरणात नरवडे यांनी पैशाची मागणी केली व त्यात मध्यस्थी ही कुंभार यांनी केली. यामध्ये एक लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही रक्कम राहत्या घरी घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ही कारवाई केली. त्यामुळे महसुल विभागातील खाऊगिरी आणि भ्रष्टता समोर आली आहे.

दिवसेंदिवस बीड (Beed) जिल्ह्यात लाचखोरीचे प्रकार वाढत असून आता लोकहितासाठी काम करणाऱ्या संघटनाही यात बरबटल्याचे दिसून येत आहे. आज माजलगावात घडलेल्या घटनेनंतर खळबळ उडाली असून या प्रकरणात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!