बीड हादरलं… बस स्थानकासमोर भर गर्दीत तरुणाचा खून.

बीड दि.14 डिसेंबर – बीड (Beed) शहरात भर गर्दीत असलेल्या बसस्थानकासमोर थरकाप उडवून देणारी धक्कादायक घटना घडली. अज्ञात तीन ते चार जणाच्या टोळक्याने एका 24 वर्षीय तरुणावर सशस्त्र हल्ला चढवून खून (Murder) केला. सदर घटना आज दुपारी 4 च्या सुमारास घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
(Beed trembled … Murder of a young man in a crowd in front of the bus stand.)
बसस्थानका (bus stand) समोरील एचडीएफसी बँकेसमोरच (HDFC Bank) थरारक घटना घडली. बीड शहरातील खासबाग भागात राहणारा 24 वर्षीय शेख शाहिद शेख सत्तार या तरुणावर आज दुपारी 4 वा. बसस्थानकासमोरील एचडीएफसी बँकेसमोर तीन ते चार तरुणांनी धारदार शस्त्राने वार केले. दिवसाढवळ्या सशस्त्र हल्लेखोरांनी तरुणावर सपासप वार केल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
तरुणाच्या अंगावर तलवारीसह अन्य धारदार शस्त्राने वार केल्याने सदरील तरूण रक्ताच्या थारोळ्यात पडला. भर गर्दीच्या ठिकाणी सदरील प्रकार घडल्याने एकच कल्लोळ उठला. या घटनेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी युवकास उपचारासाठी बीड (Beed) येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. सदरील हल्ला करणारे हल्लेखोर पसार झाले असून हल्लेखोर कोण होते याचा शोध पोलीस (Police) घेत आहेत. सदरची घटना का व कशासाठी घडली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.