बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आजची संख्या.. पहा तालुका निहाय रुग्ण संख्या.

बीड दि.30 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2194 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 29 जणांचा कोविड-19 (Covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (Positive) आला आहे. तर 2165 जण निगेटिव्ह आली आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याचे दिसत आहे.

(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)

तालुका निहाय आकडेवारी….
बीड-6, अंबाजोगाई-2, आष्टी-4, धारुर-0, गेवराई-1, केज-4, माजलगाव-2, परळी-0, पाटोदा-5, शिरुर-2, वडवणी-3 अशी आहे.

बीड जिल्ह्यात कोरोना आठवड्यात 12 मृत्यू झाले आहेत. बाधितांची संख्या कमी झाली असून जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे होत आहे. सक्रीय रुग्णांची संख्या झपाट्याने उतरली आहे. बुधवारी आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनूसार सध्या जिल्ह्यात 328 सक्रीय रुग्ण आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात बुधवारी 3,187 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 253 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 63 लाख 68 हजार 530 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.26 टक्के आहे. राज्यात बुधवारी 49 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 9, 280 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!