दिलासादायक चार तालुके निरंक… बीड जिल्ह्यात आजची कोरोना रुग्ण संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.6 सप्टेंबर – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे आज 2654 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 45 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 2609 जण निगेटिव्ह आली आहेत. आज कोरोना बाधिताचा आकडा पन्नासच्या आत आला आहे. यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता कोरोनामुक्तीकडे झाल्याचे अहवालातून दिसत आहे.
(Today’s number of corona patients in Beed district; See taluka wise statistics.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-10, अंबाजोगाई-6, आष्टी-16, धारुर-0, गेवराई-4, केज-4, माजलगाव-0, परळी-1, पाटोदा-0, शिरुर-0, वडवणी-4 अशी आहे.
बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. आजची संख्या दुसऱ्या लाटेतील सर्वात कमी संख्या आहे. काल दि.5 रविवारी 98 रुग्णांची सुट्टी झाली. सध्या जिल्ह्यात 808 ॲक्टीव रुग्ण आहेत.
दरम्यान, राज्यात रविवारी 4,130 नवीन कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 506 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 88 हजार 851 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 02 टक्के आहे.
राज्यात 64 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 52 हजार 025 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 469 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.