नायब तहसीलदार लाच घेताना चतुर्भूज; कळंबमधील घटना

कळंब दि.23 मार्च- लॉकडाऊन (lockdown) काळात आलेले मोफत धान्य वाटप केल्याच्या बदल्यात रेशन दुकानदारांना त्याचा मोबदला म्हणून एका क्विंटलमागे १५० रुपये प्रमाणे शासनाकडून बिल दिले जाते. हे बिल मिळण्यासाठी एका रेशन दुकानदाराला ६ हजार ७०० रुपयाची लाच घेतल्याची घटना कळंब येथे घडली आहे. सदर लाच घेतल्याप्रकरणी महिला नायब तहसीलदार यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील एका दुकादाराने दिलेल्या तक्रारीवरून सदर कारवाई करण्यात आली आहे. सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.

(Deputy Tehsildar arrested for taking bribe; Incidents in Kalamb)

कोरोना काळात लॉकडाउन (lockdown) दरम्यान लोकांची उपासमार होऊ नये म्हणून राज्य सरकारने प्रत्येक रेशन दुकानातून मोफत धान्य वाटप केले होते, या धान्याचे मोफत वाटप केल्याच्या बदल्यात दुकानदार याना मेहनताना स्वरूपात कमिशन देण्याचा निर्णय घेत काही रक्कम दिली. मात्र ही रक्कम वाटप करताना त्यात पुरवठा विभागात सर्रास लाच (bribe) घेत असल्याच्या तक्रारी येत होत्या. कळंब येथील रेशन दुकानदाराचे ४४ हजार ६२३ रुपये बिल काढण्यासाठी ६ हजार ६९३ रुपयाची लाचेची मागणी करण्यात आली होती. या लाच मागणाऱ्या नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) व रेशन दुकान संघटनेचे अध्यक्षासह एकास उस्मानाबाद लाचलुचपत विभागाने (Anti-Corruption Bureau) रंगेहात अटक केली आहे.

तक्रारदार याच्याकडून बिलाच्या रकमेचे पंधरा टक्के म्हणजे ६ हजार ६९३ रुपये लाचेची (bribe) मागणी करून आरोपी डोंगरे यांच्या मार्फतीने पंचांसमक्ष ही लाचेची रक्कम स्वीकारलेने कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कळंब तहसील कार्यालय येथील पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) श्रीमती परविन उमर दराज खान पठाण (वय ४७ वर्ष) यांच्यासह कळंब तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार संघटनाचे अध्यक्ष श्रीरंग साधू डोंगरे (वय ६४ वर्ष रा. कोथळा, ता.कळंब) स्वस्त धान्य दुकानदार विलास ज्ञानोबा पिंगळे (वय ५५ वर्ष, रा.पाथर्डी, ता.कळंब) या ३ जणांना अटक करण्यात आली आहे.

सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद, प्रशांत संपते पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभाग (Anti-Corruption Bureau) उस्मानाबादचे पोलीस निरीक्षक गौरीशंकर पाबळे यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, विशाल डोके, अविनाश आचार्य, अर्जुन मारकड चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!