कोरोंना विशेष
बीड परळीचे मीटर सुरुच; ११ नवीन पॉझिटीव्ह

बीडः मध्यरात्री बारा वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोनाचे मीटर सुरुच असल्याचे दिसत असुन एकुण अकरा पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. बीड व परळीतील पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कातील बाधितांची संख्या वाढली आहे.
रात्री आलेल्या माहितीनुसार बीड शहरात माऊली कॉलनीतील २ तर १ खाजगी रुग्णालयातील कर्मचारी असे ३ जन बाधित आढळून आले आहेत. तर परळी शहरात सर्वाधिक ५ नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळली आहेत. याशिवाय गेवराईत एक व तालुक्यातील केकतपांगरी गावात एक असे दोन तर केज तालुक्यातील होळमध्येही एक रुग्ण आढळला आहे. अशा ११ नवीन रुग्णांची भर बीड जिल्ह्यात पडली आहे. जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात सामाजिक संक्रमण वाढत आहे. आढळून आलेल्या रुग्णात ८ पुरुष तर ३ महिला संक्रमित आहेत.