शेती विषयक

मराठवाडा, विदर्भासह राज्यात पाऊस व गारपिटीची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज.

मुंबई दि.26 डिसेंबर – आजपासून (दि.26 डिसेंबर) वायव्य भारतावर व 27 डिसेंबरपासून मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात 28-29 डिसेंबरला मराठवाडा (Marathwada), विदर्भ (Vidarbha) आणि उत्तरमहाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

(Chance of rain and hail in Marathwada, Vidarbha and other states; Weather forecast.)

वर्षाच्या शेवटी सुद्धा पाऊस बरसणार असल्याची माहिती आयएमडीकडून (IMD) देण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्यावतीनं (IndianIndian Meteorological Department) राज्यात ऐन थंडीच्या दिवसात पुढील दोन दिवसात 28 आणि 29 तारखेला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

मराठवाडा विदर्भाला यलो ॲलर्ट
हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यात 28 आणि 29 तारखेला पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद (Aurangabad), गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्हयांना यलो अलर्ट (yellow alert) देण्यात आलाय.

ऐन हिवाळ्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बी हंगामात निर्माण झालेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याची शक्यता आहे. खरंतर, सध्या वायव्य आणि मध्य भारतात पश्चिमी चक्रावात आणि त्याच्या चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव जाणवत आहेत.

हरियाणासह उत्तर प्रदेश, पंजाब, मध्य प्रदेश या भागात मुसळधार पावसासह (heavy rains) गारपिटचा इशारा देण्यात आला आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून राज्यातही अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. मंगळवारपासून राज्यात कोकण वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!