रमेश कोमटवार यांचे निधन; अकरा वाजता होणार कळंब येथे अंत्यविधी

किल्लेधारूर दि.१ नोव्हेंबर- (वार्ताहर) येथील रमेश रघुनाथ कोमटवार Komatwar (६२) यांचे हैद्राबाद Hyderabad येथे उपचार सुरु असताना काल सायंकाळी निधन झाले. त्यांच्यावर कळंब तालुक्यातील मांगवडगाव येथील शेतात आज सकाळी अकरा वाजता अंत्यविधी करण्यात येणार आहेत.
रमेश कोमटवार Komatwar यांचे गतवर्षी झालेल्या अपघातानंतर त्यांच्या फुप्फूसावर ईजा झाली होती. अलिकडे त्रास जाणवत असल्यामुळे त्यांच्यावर पंधरा दिवसांपासुन हैद्राबाद Hyderabad येथे अपेक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. काल दि.३१ रोजी सांयकाळी सहा वाजता उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मावळली. गतवर्षी बस व ट्रकच्या अपघातात त्यांचे लहान बंधू दिनेश कोमटवार यांचे निधन झाले होते. रमेश कोमटवार यांच्या निधनामुळे धारुर व कळंब तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. आज दि.१ रविवारी कळंब येथील मांगवडगाव येथील शेतात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे.