आ. संदीप क्षीरसागर यांना धक्का…. राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

बीडः दि.२९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात नेहमी चर्चेत असणाऱ्या काका पुतणे पुन्हा नव्या घटनेमुळे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संदीप क्षीरसागर गटाच्या बुड नगर परिषदेच्या चार नगरसेवकांनी त्यांची साथ सोडत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नेतृत्व स्विकारत हाती शिवबंधन बांधत शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केले आहे. यामुळे पुन्हा काका पुतणे चर्चेत आले आहेत.
बीड नगर परिषदेत माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांची एक हाती सत्ता आहे. नगर परिषद निवडणूकीत संदीप क्षीरसागर यांनी काकू नाना आघाडीच्या माध्यमातून मोठे आव्हान निर्माण करत चांगले यश मिळवले होते. यानंतरही जिल्हा परिषद निवडणूकीत पुतण्या काकावर भारी पडल्याचे निदर्शनास आले. विधानसभा निवडणूकीतही राष्ट्रवादीचे (NCP) संदीप क्षीरसागरांनी (Sandip Kshirsagar) काका जयदत्त क्षीरसागर (Jaydatta Kshirsagar) यांना मात देत विजय मिळवला. आमदार असताना मात्र पुतण्या जवळचे शिलेदार कमी होत असल्याचे दिसत आहे. आज दि.२९ शुक्रवारी बीड नगर परिषदेतील ४ आ. क्षीरसागर समर्थक नगरसेवकांनी हातात शिवबंधन बांधत नगराध्यक्ष डॉ. भारतभुषण क्षीरसागर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (Shiv sena) प्रवेश केला. यात नगरसेवक रणजीत बन्सोडे, सिता भैय्यासाहेब मोरे, कांताबाई बन्सीधर तांदळे, प्रभाकर पोकळे यांचा समावेश आहे. हा आमदार संदीप क्षीरसागर (Sandip Kshirsagar) यांना मोठा धक्का मानला जात आहे.