बीड

Narmada Fire .. तेलगाव येथे अग्नितांडव ; नर्मदा जिनिंगमध्ये आगीत लाखोंचे नुकसान.

51 / 100

किल्लेधारुर दि.16 जून – Narmada Fire धारुर तालुक्यातील तेलगाव येथे आज अग्नितांडव दिसून आले. तेलगाव येथील विज कंपनीच्या पाॅवर हाॅऊस परिसरात आग लागली. मात्र सुदैवाने मोठा धोका टळला. परंतू तेलगाव परळी राज्यमार्गावर भोपा येथील नर्मदा Narmada कोटेक्स जिनींगला शुक्रवारी दुपारी अचानक आग लागून जिनिंगमधील कापसासह कांही मशिनरी जळाल्या. यामुळे लाखो रूपयांचे नुकसान झाले. Fire at Telgaon; Fire damages lakhs in Narmada Ginning.

तेलगाव येथील पॉवर हॉऊस येथे लागलेली आग
तेलगाव येथील पॉवर हॉऊस येथे लागलेली आग

दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानात आज धारुर तालुक्यातील तेलगाव येथे अग्नितांडव पहायला मिळाले. दुपारी तेलगाव येथील विज कंपनीच्या पाॅवर हाॅऊस परिसरात आग Fire लागली. सुदैवाने या आगीचा मोठा धोका टळला. यानंतर तेलगाव ते परळी महामार्गावर भोपा ता.धारूर येथे धारूर Dharur येथील उद्योजक तथा माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ यांच्या नर्मदा उद्योग समुहाची नर्मदा Narmada कोटेक्स जिनींग आहे. येथे सध्या शेतकऱ्यांचा कापुस खरेदी केली जात आहे. शुक्रवारी दुपारी या नर्मदा जिनींगला अचानक आग लागली. ही बाब तेथे काम करणाऱ्या मजुरांच्या लक्षात येताच त्यांनी जिनिंग व्यवस्थापक शंकर चौरे यांना सांगितली.

जिनिंग व्यवस्थापक शंकर चौरे यांनी लगेच मजुर, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने जिनिंग मधील अग्निशमन डब्ब्यांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न करत तेलगाव येथील लोकनेते सोळंके कारखान्याच्या अग्निशमन दलास माहिती देत ते बोलावून घेतले. तसेच माजलगाव व धारूर Dharur या दोन्ही नगर परिषदच्या अग्निशमन दलास Fire brigade पाचारण केले. कडक उन्हाचा पारा असल्याने आगीच्या ज्वाला भडकत आग पसरत होती. मात्र जिनिंगमधील मजुर, कर्मचारी यांनी शर्थीचा प्रयत्न करत वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले. परंतु आगीचा भडका जास्त होता त्यामुळे या आगीत जवळपास चारशे क्विंटल कापूस जळाल्याचा अंदाज आहे. तर कापूस आतमध्ये नेण्यासाठी वापरण्यात येत असलेले दोन हार्डबाॅक्स पट्टयांसह जळाले. यामुळे या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले. ही आग कशामुळे लागली याचे कारण समजु शकले नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!