क्राईम न्यूज… नागपुरात पाच जणांची हत्या करुन एकाची आत्महत्या; बीडमध्ये हुंडाबळी; तर नाथसागरात तरुण बुडाला.

नागपुर/बीड/पैठण दि.21 जून – नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करत हत्या करणाऱ्या व्यक्तीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर बीडमध्ये एका वीस वर्षीय विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून आत्महत्या केली. तिसऱ्या घटनेत पैठण येथील नाथसागरात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली.

(Crime News … Five killed in Nagpur, one commits suicide; Hundabali in Beed; So the young man drowned in Nathsagar.)

नागपुरा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या…
नागपुर – नागपुरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या (Murder) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात आचार्यजनक बाब म्हणजे हत्या केल्यानंतर हत्या (Murder) करणाऱ्या त्या इसमाने स्वतःही आत्महत्या केली. नागपुरातल्या पाचपावली भागात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. दरम्यान घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आलोक माथुरकर याने आपली पत्नी, मुलगा, मुलगी यांची हत्या केली. नंतर तिथेच थोड्या अंतरावर राहणाऱ्या सासरी जाऊन सासू आणि मेहुणीची हत्या केली. हत्या केल्यानंतर तो पुन्हा आपल्या घरी आला आणि गळफास घेत आत्महत्या करुन जीवन संपवलं.

रविवारी रात्री या हा सगळा प्रकार घडल्याचं समजत आहे. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा केला असून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. कौटुंबिक कलहातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
—-

पाच लाखांसाठी विवाहित महिलेचा छळ; जाचास कंटाळून महिलेची आत्महत्या…
बीड – लग्नात राहिलेली हुंड्याची पाच लाख रुपयांची रक्कम घेऊन का येत नाही या कारणावरून एका 20 वर्षीय विवाहित महिलेचा छळ होत असे. या छळाला कंटाळून सदरील महिलेने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केली. ही घटना शाहूनगर भागात घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासु विरोधात 498, 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पल्लवी विनोद जानवळे (वय 20) या महिलेचा गेल्या वर्षी विवाह झाला होता. लग्नामध्ये 5 लाख रुपये हुंडा राहिल्याने तिचा पती व सासू सातत्याने छळ करत असे. या छळाला कंटाळून महिलेने रात्री आपल्या शाहूनगर भागातील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी (Police) पंचनामा केला. आरोपी पती व सासू विरोधात कलम 498, 306 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
—–

नाथसागरात तरुण बुडाला…..
पैठण –  जोरदार वारे व लाटा उसळत असताना जायकवाडी धरणात (Jayakwadi dam) पोहण्यासाठी उतरलेल्या 24 वर्षीय तरूणाचा सोमवारी सायंकाळच्या सुमारास बुडून मृत्यू झाला आहे. आदेश सिरसाठ रा. भिंगार जि. अहमदनगर असे मयत तरूणाचे नाव आहे. मृतदेह शोधण्यासाठी पोलीसांचे शोधकार्य सुरू असून सायंकाळ पर्यंत मृतदेह पोलीसांच्या (Police) हाती लागला नव्हता.

भिंगार जि.अहमदनगर येथील रहिवासी आदेश शिरसाठ हा तरुण ईसारवाडी ता.पैठण येथे नातेवाईकाच्या विवाह सोहळ्यासाठी आला होता. दरम्यान मित्रासह सोमवारी दुपारी आदेश सिरसाठ हा तरूण जायकवाडी धरणावर (Jayakwadi dam) आला. जोरदार वाऱ्यामुळे नाथसागरात (Nathsagar) लाटा उसळत असल्याने पोहण्याचा हट्ट धरलेल्या आदेशला मित्राने पोहण्यासाठी नकार दिला. आदेशच्या मित्राच्या कुटुंबातील काहीजण धरण पाहण्यासाठी आल्याने तो मित्र त्यांच्या सोबत गेला.  आदेशने मात्र मित्राचा सल्ला न ऐकता पाण्यात उडी मारली, पाण्यात लाटा उसळत असल्याने त्याला पोहता आले नाही व तो पाण्यात बुडाला.

घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक किशोर पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन जाधव, रामकृष्ण सागडे, सुधीर ओव्हळ, राजू आटोळे आदींनी धरणावर धाव घेऊन स्थानिक मच्छीमार व पोहणाऱ्या तरूणांच्या मदतीने नाथ सागराच्या (Nathsagar) पाण्यात शोध कार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आदेश सिरसाठचा मृतदेह हाती लागला नव्हता. दरम्यान औरंगाबाद येथील अग्निशमन दलाला शोधकार्य करण्यासाठी बोलावण्यात आले आहे असे पोलीस निरीक्षक पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!