बीडमध्ये पैशांचा पाऊस…? मांत्रिकाने तब्बल साडेतीन लाखाला गंडवले.

बीड दि. 19 नोव्हेंबर – पैशांचा पाऊस पाडतो म्हणून बीड जिल्ह्यातील (Beed) खालापुरी येथील पाच युवकांना एका मांत्रिकाने तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दोन दिवसांपुर्वी पोलिसांनी बनावट नोटां व मशिनसह ताब्यात घेतले होते.
(Rain of money in Beed …? The witch ruined three and a half lakhs.)
बीड (Beed) जिल्ह्यातील रायमोहा येथील पाच युवकांना मांत्रिकाने प्रथम अंबेजोगाई (Ambajogai) व नंतर अहमदपूर येथे बोलावले. या युवकांकडून तीन लाख 50 हजार रुपये देऊन त्याबदल्यात एक सॅग दिली. त्यात तिप्पट रक्कम असल्याचे त्याने सांगितले. येथे पोलीस आहे असे सांगून मांत्रिक निघून गेला. सदरील प्रकार दोन दिवसांपुर्वी समोर आल्यानंतर चौकशीत हा धक्कादायक प्रकार समोर आला.
मुलांनी सॅग उघडली त्यावेळेस त्यात बच्चो का बँक असे छापलेल्या खेळण्यातील नोटा असल्याने फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले. त्याच नोटा मोजत असताना शिरूर ठाण्याचे पोलीस निरीक्षक (Police Inspector) सिद्धार्थ माने रात्री गस्त घालताना खालापूरी येथे एका वाहनात खोके आणि पैसे मोजण्याची मशीन आढळली. यावेळी पोलिसांनी (Police) पाच तरुणांना ताब्यात घेतले.
त्यामुळे बनावट नोटांचे रॅकेट असल्याचे प्रथमदर्शी समोर आले होते. मात्र या तरुणांची फसवणूक करून मांत्रिकाने त्यांना खेळण्यातील नोटा हवाली केल्या. त्यामुळे या प्रकरणात आता शिरूर कासार पोलीस ठाण्यात (Police Station) एका विरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
मंत्राच्या सह्याने पैशाचा पाऊस (money shower) पाडतो, त्यासाठी तुमच्या हाती लागलेल्या नोटा द्या. जेवढ्या नोटा तुम्ही द्याल त्याच्या तिप्पट नोटा तुम्हाला देतो असे आमिष दाखवून अहमदपूर जिल्हा लातूर (Latur) येथील एका मांत्रिकाने या तरुणांना जाळ्यात अडकवले. या मांत्रिकाने तब्बल साडेतीन लाखांना या तरुणांना गंडवले आहे.