घात-अपघात

Car accident भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू ; धारुर तालुक्यातील घटना.

57 / 100

किल्लेधारुर दि 14 मे – Car accident भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धारुर Dharur तालुक्यात घडली. दि.13 शनिवारी भरधाव कार व ॲटोरिक्षाची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात Car accident चार जण गंभीर जखमी झाले होते. यातील एका तरुणाचे आज उपचार सुरु असताना निधन झाले. A young man died in a car accident; Incidents in Dharur Taluka.

धारुर Dharur तालुक्यातील तेलगाव ते भोपा रस्त्यावर दि.13 शनिवारी भरधाव वेगात धावत असलेल्या तेलगावच्या दिशेने येणाऱ्या कारची भोपाकडे जाणाऱ्या ॲटोरिक्षास जोराची धडक बसून भीषण अपघात Car accident झाला. या अपघातात ॲटोमधील चार जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात शनिवारी दुपारी चार वाजे दरम्यान तेलगाव भोपा दरम्यान घडला. विशेष म्हणजे पाच दिवसापुर्वीही याच दरम्यान ऑटो व कारचा अपघात Car accident होऊन त्यातही तीन जण गंभीर जखमी झाले होते. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. ॲटोरिक्षा भोपा जवळील खडीक्रेशर जवळ आला असता समोरून भरधाव वेगात येत असलेल्या स्वीप्ट कार क्र.एम.एच.06 बी.एम.0387 ने ॲटोरिक्षाला जोराची धडक दिल्याने सदर ॲटोरिक्षा रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जाऊन पडला. यात ॲटोरिक्शाचा चक्काचूर झाला असुन कारही खड्ड्यात गेली आहे. यात ॲटोरिक्शातील चार जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हनुमान मुंडे, अजिंक्य कदम, शाम वाघचौरे, तुषार मुळे यांचा समावेश असून, जखमीपैकी हनुमान मुंडे व अजिंक्य कदम या दोघांना बीडच्या तर शाम वाघचौरे व तुषार मुळे या दोघांना माजलगाव येथील खाजगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

उपचार सुरु असताना एकाचे निधन…
तेलगाव ते भोपा दरम्यान पाच दिवसापुर्वी रात्री च्या वेळी एका ॲटोरिक्षाचा व कारचा अपघात झाला होता. त्यात ॲटोरिक्षातील तीन जण गंभीर जखमी झाले होते. जखमींमध्ये लहान बालकासह महिला जखमी होते. त्यांच्यावरही बीड Beed येथील रूग्णालयात उपचार चालु असून, त्या ॲटोरिक्षातील जखमी लऊळ ता.माजलगाव येथील होते. पाच दिवस उलटत नाहीत तोच शनिवारी पुन्हा तेलगाव भोपा ता. धारुर दरम्यानच ॲटोरिक्षा व कारचा अपघात झाला. या अपघातात जखमी असलेल्या अजिंक्य आशोक कदम (वय 18) या तरुणाचा बीड Beed येथे उपचार सुरु असताना मृत्यू झाला. बालपणीच पितृछत्र हरवलेल्या अजिंक्यच्या अपघाती मृत्यूमुळे भोपा गावात शोककळा पसरली. आज दि.14 रविवारी शवविच्छेदनानंतर भोपा येथे शोकाकुल वातावरणात अजिंक्यच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!