आज पुन्हा मोठी वाढ..बीड जिल्ह्यातील आजची कोरोना बाधितांची संख्या; पहा तालुका निहाय आकडेवारी.

बीड दि.19 अॉगस्ट – बीड (Beed) जिल्हा प्रशासनाकडे तब्बल 5852 अहवाल प्राप्त झाले आहेत. या पैकी 143 जणांचा कोविड-19 (covid-19) अहवाल पॉझिटीव्ह (positive) आला आहे. तर 5709 जण निगेटिव्ह आली आहेत.
(Todays corona update in Beed district …. see taluka wise numbers.)
तालुका निहाय आकडेवारी….
बीड-12, अंबाजोगाई-7, आष्टी-66, धारुर-3, गेवराई-8, केज-8, माजलगाव-5, परळी-0, पाटोदा-20, शिरुर-2, वडवणी-12 अशी आहे.
बीड जिल्ह्यात दि.16 सोमवार रोजी पाच महिन्यातील सर्वात कमी 92 संख्या आल्यानंतर मंगळवारी पुन्हा वाढ होवून 107 नवीन बाधित आढळून आली तर आज 143 संख्या आली आहे. यामुळे दिलासा मिळत असताना पुन्हा बाधितांची संख्या शंभरच्या वर गेली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची 5132 नवीन प्रकरणे नोंदली गेली, त्यानंतर राज्यात संक्रमित लोकांची संख्या 64,06,345 वर गेली आहे. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
अधिकाऱ्याने सांगितले की, साथीच्या आजारामुळे राज्यात 158 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यानंतर राज्यातील मृतांची संख्या 1,35,413 झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत बुधवारी राज्यात नवीन प्रकरणे आणि मृत्यूंची संख्या वाढली आहे.