कोरोंना विशेष

धारुरच्या २३ थ्रोट स्वॅबची प्रतिक्षा; नवीन पाच रुग्ण वाढले

 

किल्लेधारूर दि.१३(वार्ताहर) शहरात आढळून आलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाच्या जवळच्या संपर्कात आलेल्या २३ लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला  पाठवण्यात आली असून आज अहवाल प्राप्त होणार असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. चेतन आदमाने व तालुका आरोग्य अधिकारी सचिन शेकडे यांनी दिली. दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात पुन्हा पाच पॉझिटीव्ह रुग्णाची भर पडली आहे.

जुलै महिना कोरोना संसर्गात विस्फोटक ठरत आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नवीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाने हॉटस्पॉट झोन मधून येणाऱ्या प्रवाशांचे थ्रोट स्वॅब तपासणीस सुरुवात केल्यामुळे पॉझिटीव्ह रुग्ण आढळत आहेत. तर या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सहवासितांना लागण होवून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. धारुर शहरात गेल्या आठवड्यात तीन रुग्ण आढळून आली आहेत. आज या रुग्णाच्या अतिजवळचा संबंध आलेल्या २३ जनांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठवण्यात आले आहेत. या स्वॅबचा अहवाल संध्याकाळी येणार असल्याची माहिती डॉ. आदमाने व डॉ. शेकडे यांनी दिली. दरम्यान आज दुपारी २ वाजता जिल्ह्याचा कोरोना बाधिताचा आकडा वाढला असुन परळीत ४ तर बीड मध्ये एक बाधिताच्या सहवासातील पॉझिटीव्ह आढळून आली आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!