धक्कादायक …..दुसऱ्या दिवशीही राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी….

मुंबई :दि, 7 मार्च- राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्येत वाढच होत आहे. शुक्रवारनंतर शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची नोंद झाली आहे. सरकार राज्यातील जनतेला कोरोनाच्या नियमांचं सक्तीने पालन करण्याचं आवाहन करत असताना नागरिक मात्र नियमांचं सर्रासपणे उल्लंघन करताना दिसत आहेत.
(Shocking ….. Statistics that raise the concern of the state even on the second day ….)
गेल्या 24 तासात महाराष्ट्रात दहा हजार 187 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 47 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या 22 लाख 08 हजार 586 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत 52 हजार 440 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर 2.37 टक्के आहे.
राज्यात सध्या अॅक्टिव्ह (Active) रुग्णांची संख्या 92 हजार 897 आहे. त्यात सर्वाधिक 19 हजार 615 अॅक्टिव्ह (Active) रुग्ण पुणे जिल्ह्यात आहेत. त्यानंतर नागपूर जिल्ह्यात हा आकडा 11 हजार 480 इतका झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची आकडेवारी 10 हजारांच्या पुढे आहेत. जिल्ह्यात सध्या 10 हजार 44 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर एकट्या मुंबई महापालिका हद्दीत ही रुग्णसंख्या 8 हजार 984 इतकी झाली आहे.