धारुरचे माजी सैनिक जिवराज अंडील यांचे निधन; ढगेवाडीत होणार अंत्यसंस्कार.

किल्ले धारूर दि.30 मे – माजी सैनिक संघटनेचे मार्गदर्शक धारुर तालुक्यातील ढगेवाडी येथील माजी सैनिक जिवराज हरिभाऊ अंडील (वय 68) यांचे अल्पश्या आजाराने आज दि.30 सोमवारी पहाटे निधन झाले. त्यांच्यावर ढगेवाडी येथे सोमवारी सकाली 10:00 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
जिवराज अंडील यांनी देशाच्या विविध राज्यात सैनिकी सेवा केली आहे. सेवानिवृत्तीनंतर ते मुळगाव धारुर तालुक्यातील ढगेवाडी येथे कुटूंबियांसोबत शेती पाहत होते. आमदार प्रकाशदादा सोळंके यांचे खंदे समर्थक म्हणून ते तालुक्यात परिचित होते. स्पष्ट वक्ता व सार्वजनिक कामात अग्रेसर राहणारा कार्यकर्ता म्हणून ही त्यांची ओळख होती. येथील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
कोविड काळात कोरोना सारख्या आजाराला परतावून लावणारे जिवराज अंडील गेल्या काही दिवसांपासून अर्धांगवायूने आजारी होते. आज पहाटे 2 च्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात दोन मुलं, एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सोमवार (दि.30) रोजी सकाळी 10 वाजता ढगेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
(Former soldier Jivraj Andil dies; Funeral will be held at Dhagewadi.)