धुम धडाक्यात लग्न सोहळा…. अंबाजोगाईत पोलिसांची कारवाई  

अंबाजोगाई दि.२१ (प्रतिनिधी)- जिल्हाधिकारी बीड यांनी कोरोना संदर्भात देण्यात आलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत धुम धडाक्यात लग्न सोहळा सुरू असताना अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी एम पवार यांच्या पथकाने ज्या ठिकाणी लग्न सोहळा सुरू होता त्या हॉटेलवर धाड टाकून हॉटेल मालक, ज्यांच्या घरी लग्न होते ती मंडळी आणि डॉल्बी मालक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

(Wedding ceremony in Dhum Dhadaka …. Police action in Ambajogai)

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बीडचे जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, मंगल कार्यालय, खाजगी क्लासेस यांच्या वर दोन दिवसांपुर्वीच निर्बंध आणत कार्यवाहीचे संकेत दिले. मात्र दि. २० फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वा.चे सुमारास अंबाजोगाई शहरातील तथागत चौक या ठिकाणी असलेल्या “हाॅटेल प्रवीण बार व रेस्टॉरंट येथील हाॅटेल च्या बाजुस असलेल्या मोकळ्या मैदानात जिल्हाधिकारी बीड यांनी कोरोना संदर्भात दिलेल्या आदेशाला केराची टोपली दाखवत धुम धडाक्यात लग्न सोहळा सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बी एम पवार यांच्या पथकाने “हाॅटेल प्रवीण बार व रेस्टॉरंट” या ठिकाणी धाड टाकून हॉटेल मालक कोपले व ज्यांच्या घरी लग्न होते ते अशोक शामलाल मोदी व प्रदिप शामलाल मोदी, डॉल्बी मालक ॠषिकेश चापेकानडे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशा वरून कोवीड रोगा बाबत निष्काळजी पणा केल्याच्या कारणा वरून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन येथे कलम १८८,२६९, २७० भा.दं.वि. व कलम ५१(ब) साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम १७, १३५ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद केला आहे. या घटनेमुळे नियोजित लग्नांवर परिणाम होणार असून सर्वत्र खळबळ माजली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!