धारुर तहसील कार्यालयात प्रेतयात्रा; पहा काय आहे प्रकार…

किल्लेधारूर दि.8 फेब्रुवारी – धारुर शहरातील तहसील कार्यालयाच्या दारात आज (मंगळवार दि.8) रोजी सकाळीच एका महिलेचे प्रेत आणून प्रशासनाकडे अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आल्याची घटना घडली.
(Funeral procession at Dharur tehsil office; See what’s the type …)
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारुर (Dharur) तालुक्यातील गावदंरा येथे दलीत समाजाचे वहीवाटी प्रमाणे असणाऱ्या स्मशानभुमीवर व रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. सोमवारी गावात एका वृध्द महिलेचे निधन झाले असून अंत्यविधीसाठी नेत असताना अतिक्रमणधारकाने यास विरोध दर्शवला.
यामुळे वृध्द महिलेच्या नातेवाईकांनी संबंधीत महिलेचे प्रेतच धारुर येथील तहसील (tehsil office) कार्यालया समोर आणूण ठेवले. संबंधीत स्मशानभुमीचा प्रश्न मार्गी लागल्या शिवाय हा अंत्यविधी न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. सदर प्रकाराची माहिती मिळताच तहसीलदार या घटनास्थळी गेल्या आहेत.
तालूक्यातील गावदंरा येथे मांतग, महार, चांभार समाजाची वहीवाटी प्रमाणे गावाचे उत्तरेला स्मशानभुमी आहे. हि स्मशानभुमी अनेक वर्षा पासून असताना शेजारील शेतकऱ्यांने जाणारे येणारे रस्त्यावर व स्मशानभुमी वर अतिक्रमण केल्याने यापुर्वीही अंत्यसंस्कार (Funeral) करताना अडथळा आणला होता.
सोमवार दि. 7 फेब्रुवारी रोजी दलीत समाजातील वृध्द महिला सरूबाई मारूती सौंदरमल (वय 90) यांचे निधन झाले. अंत्यविधीसाठी हे घेऊन जात असताना दहा वर्षा पासून अतिक्रमण केलेल्या शेतकऱ्यांने त्यांना जाताना अडवले. यामुळे या नातेवाईकानी अंत्यसंस्कार न करता मंगळवारी सकाळी हे प्रेत नातेवाईकानी तहसील समोर आणूण ठेवले.
स्मशानभुमीवरचे व रस्त्यावरील अतिक्रमण काढल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तहसीलदार व्हि.एस. शिडोळकर यांनी या नातेवाईकाना समजवण्याचा व प्रश्न सोडवण्याचे अश्वासन दिले. मात्र प्रश्न मार्गी लावल्या शिवाय अंत्यसंस्कार न करण्यावर नातेवाईक ठाम होते. तहसीलदार (Tehsildar) गावदंरा येथे घटनास्थळा कडे गेल्या होत्या तहसीलचे प्रवेशद्वारावर ठेवल्याने येथे पोलीस (Police) बंदोबंस्त कडक ठेवण्यात आला होता.