राज्यमंत्री अब्दूल सत्तार कोरोना पॉझिटीव्ह;

मुंबईः काल वस्त्रोद्योग मंत्री असलम शेख यांना कोरोना झाल्यानंतर आज राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांना ही कोरोनाची लागण झाली असुन त्यांच्यावर मुंबई येथील राहत्या घरात उपचार सुरु असल्याची माहिती त्यांनी स्वतः आपल्या फेसबुक पेज वरुन दिली आहे. सत्तार हे कोरोनाची लागण होणारे राज्यातील पाचवे मंत्री आहेत.
राज्यातील आघाडी शासनातील जितेंद्र आव्हाड, आशोक चव्हाण, धनंजय मुंडे व असलम शेख या कॕबिनेट मंत्र्यांनतर कोरोनाग्रस्त होणारे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे पाचवे मंत्री ठरले आहेत. सत्तार शिवसेनेचे सिल्लोड येथील आमदार आहेत. ते राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री आहेत. थोडी शंका आली म्हणून तपासणी केली असता कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याचे सांगत संपर्कात आलेल्यानी स्वतःची तपासणी करावी असे फेसबुक पेजवरुन आवाहन केले. लिलावती रुग्णालयातील डॉ. जलील पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेवून घरीच कोरोंटाईन असल्याचे सांगत सर्व व्यवस्थित असल्याचे सांगितले. सर्वांनी अल्लाह, इश्वर, भगवंताकडे प्रार्थना करण्याचे करण्याची विनंतीही त्यांनी केली.