राजकीय

mohanjagtap महाविकास आघाडीचे उमेदवार मोहन जगताप यांना उत्स्फुर्त प्रतिसाद.

60 / 100

किल्लेधारुर  दि.7 नोव्हेंबर – mohanjagtap माजलगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप यांनी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने धारूर तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, ढगेवाडी, चारदरी, थेटेगव्हाण, आणि पहाडी पारगाव येथील मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून माजलगाव मतदारसंघात उमेदवारांनी गावभेटीवर भर दिल्याचे दिसून येत आहे. दि.6 बुधवारी माजलगाव विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार मोहनदादा जगताप यांनी प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने धारूर तालुक्यातील आरणवाडी, चोरंबा, ढगेवाडी, चारदरी, थेटेगव्हाण, आणि पहाडी पारगाव येथील मतदारांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांना मतदारांनी भरभरुन प्रतिसाद दिला. या भेटीत मतदारसंघातील स्थानिक समस्यां सोडवून विकासाच्या योजना राबविण्याचे आश्वासन जगताप यांनी उपस्थितांना दिले. आपल्या विकासासाठी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवत असून तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोरील बटन दाबून मतरुपी आपले आशीर्वाद द्यावे अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी महाविकास आघाडीचे नेते अर्जूनराव गायकवाड, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष युवराज लगड, शेख समीर आदी पदाधिकारी व मतदार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!