लातूरात शनिवार, रविवार जनता कर्फ्यू … जिल्हाधिकाऱ्यांची घोषणा…

लातूरः दि.२५- दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्या पाहता खबरदारी म्हणून लातूर (Latur) जिल्ह्यात दि.२७ व २८ फेब्रुवारी शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू (Public curfew) लावणार असल्याची घोषणा लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज (Collector Pruthviraj B.P.) यांनी केली आहे.

(Public curfew in Latur on Saturday, Sunday … Collector’s announcement …)

राज्यात आठवडाभरात कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. बुधवारी राज्यात ८ हजार ८०७ नवीन कोरोना रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. तर लातूर जिल्ह्यात बुधवारी ९८ कोरोना बाधितांची (Corona Positive) भर पडली. यातच येथील एका शाळेतील तब्बल ४५ विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. यामुळे खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यावर सक्ती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्णय घेण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

लातूर (Latur) जिल्ह्याची कोरोना आकडेवारी २५ हजारावर गेली असून मृतांचा आकडा ७०३ वर पोहोचला आहे. संभाव्य धोका पाहता लातूरचे जिल्हाधिकारी बी.पी. पृथ्वीराज (Collector Pruthviraj B.P.) यांनी जनतेशी लाईव्ह संवाद साधत काळजी घेण्याचे आवाहन केले. येत्या शनिवार दि.२७ व रविवार दि.२८ रोजी लोकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये असे आवाहन करत जनता कर्फ्यूची (Public curfew) घोषणा केली आहे. यामुळे कोरोना साखळी तोडण्यात मदत होणार असून लोकांनी मास्क व सॕनिटायझरचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, अत्यावश्यक कामाशिवाय रस्त्यावर येवू नये अशा सुचना केल्या.

राज्यात गेल्या आठवड्यापासून उद्भवलेली कोरोना परिस्थिती अत्यंत स्फोटक होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची (Corona Positive) संख्या वाढतच आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यात संचारबंदी, लॉकडाऊन सारखे निर्बंध लावली जात आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आठवडाभराची अल्टीमेटल दिले होते. यातील चार दिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असलेलीच आढळली. लातूरचा हा जनता कर्फ्यू राज्यात लॉकडाऊनची नांदी ठरु नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!