केबीसीच्या नावाखाली महिलेला 3 लाखांना गंडा; धारुर तालुक्यातील घटना.

किल्लेधारूर दि.9 डिसेंबर – केबीसीच्या नावाखाली महिलेला 3 लाखांना गंडा घातल्याची घटना धारुर तालुक्यातील पहाडी दहीफळ येथे घडली. याप्रकरणी धारुर पोलिस ठाण्यात (Police Station) गुन्हा नोंद झाला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, केबीसीची (कौन बनेगा करोडपती KBC) 25 लाख रुपयांची लॉटरी व अलिशान गाडी लागल्याचे आमिष सायबर भामट्याने सामान्य कुटूंबातील अश्विनी मुंजाबा नांदे (वय 25, रा. पहाडी दहीफळ ता. धारुर) या महिलेला दिले. ‘दिदी कसम खाता हूं… झुट नही बोलूंगा…’ असे म्हणत त्या भामट्याने महिलेचा विश्वास संपादन केला अन महिनाभरात जवळजवळ तीन लाख रुपये उकळले. आपल्या सासु, सासरे, पती व तीन लेकरांसह शेती करुन उदरनिर्वाह चालवणाऱ्या अश्विनी नांदे यांच्या आपली फसवणूक झाल्याचे जवळजवळ महिनाभरानंतर लक्षात आले. यानंतर नांदे यांनी बीड पोलिस सायबर (Cyber Police) विभागाशी संपर्क साधला. पोलिस निरिक्षक Police Inspector) रविंद्र गायकवाड, उपनिरिक्षक (PSI) संदीप जाधव यांनी याबाबत अधिक माहिती घेतली. त्यांच्या तक्रारीनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार धारुर पोलिस ठाण्यात रामचंद्रकुमार याच्या विरोधात गुन्हा (crime) नोंदवण्यात आला आहे.
( 3 lakhs extorted from a woman in the name of KBC; Incidents in Dharur Taluka.)