ट्रेलरखाली येवून एकाचा जागीच मृत्यू;

केज दि.23 जून – नेकनूर जवळ एका वाहन घेऊन जाणाऱ्या अवजड वाहनाने पुढच्या चाकाखाली येत चिरडल्याने एक जण जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरील मयत चौसाळा येथील नातेवाईकांना भेटून पायी केजकडे (Kaij) जात असताना हा अपघात (Accident) झाला.
(One died on the spot after falling under the tipper;)
संजय मारुती राऊत (43) रा.कानडी माळी ता.केज (Kaij) असे मयत इसमाचे नाव आहे. संजय हे चौसाळा येथे नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. परंतु दि.22 राजी रात्री 9.30 ते 10 च्या दरम्यान तिकिटाला पैसे नसल्याने नेकनूरहून गावाकडे परत पायी निघाले होते.
मात्र नेकनूर शेजारील पुलाच्या जवळ आले असता त्यांना (MH-16 AY-5533) या अवजड वाहन घेऊन जाणाऱ्या वाहनाने चिरडले. त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात (Accident) झाल्यानंतर त्यांना नेकनूर च्या शासकीय दवाखान्यात नेण्यात आले असून तिथे त्यांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
मयत संजय राऊत यांच्या पश्चात, पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे. संजय यांच्या अपघाती निधनामुळे राऊत कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. यामुळे कानडी माळी गावात शोककळा पसरली आहे.