इंग्लंडमध्ये शिक्षित तरुणाचा अतितटीच्या लढतीत विजय…. ग्रामपंचायतीवरही मिळवला ताबा

परळीः दि.२३(प्रतिनिधी)- राजकारणाकडे तिरकस नजरेने पाहणाऱ्या तरुणांत हळूहळू बदल होत असताना दिसत आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूकीत राज्यात तरुणाईने भरभरून यश मिळवले असल्याचे दिसुन आले. परळी (Parli) तालुक्यातही एका इंग्लंड (England) मध्ये शिक्षण पुर्ण करुन आलेल्या तरुणाने ग्रामपंचायत निवडणूक लढवत अतितटीत विजय तर मिळवलाच पण ग्रामपंचायतही ताब्यात घेत गावाच्या विकासाचा चंग बांधल्याचे दिसुन आले.

बीड जिल्ह्यातील (गडदेवाडी ता. परळी (Parli) ) या ठिकाणी नुकतीच ग्रामपंचायत (Gram Panchayat) निवडणूक पार पडली. या निवडणूकीनंतर चर्चा होत आहे ती इंग्लंड मधील उच्चशिक्षित तरुणाची. इंग्लंड (England) मधील नॉटींगहॅम येथे चार वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरींगचे शिक्षण घेतलेल्या सुशांतसिंह (Sushantsing) पवार याने गडदेवाडीमध्ये ग्रामपंचायत निवडणूक लढवली. निवडणूक प्रचंड अटीतटीची होवून गावातील जनतेनी परिवर्तनाचा चंग बांधल्याने फक्त १ मताच्या फरकाने ते विजयी झाले. या निवडणुकीत सुशांतसिंह पवार या युवकाने सात पैकी चार जागा जिंकत गावची पंचायत ताब्यात घेतली. इंग्लंडमध्ये आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण घेऊन आपल्या जन्मभूमीचे ऋण फेडण्याचा ध्यास घेत सुशांतसिंहने ग्राम पंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली. सुशांतचे वडील हे सेवानिवृत्त आय.ए.एस.अधिकारी आहेत. सर्वदूर असलेल्या परिचय आपल्या गावाच्या कामाला यावा हा ध्यास सदैव मनात घेऊन त्यांचे कार्य सुरू आहे. निवडणूक लढवण्यामागच्या कारणा विषयी त्याने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मी जगभर फिरलो परंतु माझे गाव आजही विकापासून दुर आहे. उसतोड कामगारांची संख्या जास्त आहे. गावात आरोग्य उपकेंद्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी ते बांधले गेले नाही. मी आता स्वत:च्या मालकीची जागा आरोग्य उपकेंद्रासाठी देणार आहे. लहान मुलांची अंगणवाडी गावाच्या बाहेर बांधली गेली आहे. तिचे स्थलांतर गावात करणार आहोत. २०२४ पर्यंत सर्वांना घर देण्याचा पंतप्रधानांचा संकल्पाची अंमलबजावणी गावात करणार असून वृद्ध लोकांना पेन्शन मिळवून देणार. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी मी मुंबईतला मोठा व्यवसाय असतानाही गावाकडे आलो आहे, असे सुशांतसिंह (Sushantsing) यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!