परफ्यूम व्यावसायिकाकडे सापडले 160 कोटीचे घबाड; अधिकारीही चक्रावले.

कानपुर दि.24 डिसेंबर – उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) आयकर विभागाने (Income tax department) कानपूरमधील दोन मोठ्या उद्योगपतींवर मोठी कारवाई केली आहे. आयकर विभागाने देशातील मोठा परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन आणि पान मसाला व्यावसायिक केके अग्रवाल यांच्या घरावर आणि ठिकाणांवर छापेमारी केली.
(160 crore worth found by a perfume dealer; Officers also circled.)
या छापेमारीत आयकर विभागाने कपाट भरून नोटा जप्त केल्या आहेत. इतका पैसा पाहून आयकर विभाग अधिकारी देखील चक्रावले. परफ्यूम व्यावसायिक पीयूष जैन यांच्या कानपूर कन्नौज येथील राहत्या घरी आणि कार्यालयांवर केलेल्या छापेमारी आयकर विभागाला सुमारे 160 कोटी रुपये सापडले आहेत. गेल्या 24 तासांपासून ही छापेमारी सुरु आहे.
यावेळी घरातील कपाटांमध्ये नोटांनी भरलेल्या असंख्य बॅग अधिकाऱ्यांच्या हाती लागल्या. या नोटांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की आयकर अधिकाऱ्यांना त्या मोजण्यासाठी चार मशीन मागवाव्या लागल्या. मात्र, अद्याप नोट मोजणी सुरू असून अंतिम आकडा अद्याप आलेला नाही. जैन यांच्या मुंबईतील शोरुम आणि कार्यालयावरही छापेमारी केली आहे. त्याशिवाय डीजीजीआयच्या (DGGI) गुजरात आणि मुंबईच्या पथकांनी सकाळी 10 वाजता छापेमारी सुरू केली आहे. याशिवाय पेट्रोल पंप आणि कोल्ड स्टोरेजवर छापेमारी केली.
मात्र केके अग्रवाल यांच्या विविध ठिकाणी केलेल्या छापेमारीत किती रक्कम जप्त करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. छाप्यादरम्यान आयकर पथकाने त्यांच्यासोबत नोट मोजण्याचे मशीन आणले आहे. यावेळचे पैसे मोजतानाचे फोटोही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले आहे.
नोटा मोजण्यासाठी एसबीआय (SBI) अधिकाऱ्यांची मदत घेतली जात आहे, त्यानंतर जप्त केलेल्या पैशांची योग्य माहिती मिळेल. परफ्यूम (Perfume Dealer) व्यावसायिक पीयूष जैन आणि पान मसाला व्यावसायिक केके अग्रवाल यांच्या घरावर छापे टाकण्यात येत आहेत. आयटी टीमसोबतच (IT Team) अहमदाबादच्या डीजीजीआयची टीमही या मोहिमेत सहभागी आहे.
वास्तविक, अनेक बनावट कंपन्यांच्या नावाने बिले तयार करून कंपनीने कोट्यवधी रुपयांचा जीएसटी चुकवल्याचा आरोप आहे. पीयूषच्या घरातून 200 हून अधिक बनावट पावत्या आणि ई-वे बिल सापडले आहेत. पीयूष जैन यांच्या घरी मोठ्या प्रमाणात बॉक्स ऑर्डर करण्यात आले आहेत. छाप्यांमध्ये जीएसटी चोरीचा मोठा खेळ समोर आला आहे.
याचबरोबर कोट्यवधी रुपये ठेवता यावेत यासाठी प्राप्तिकर आणि जीएसटी विभागाने (GST Department) 12 हून अधिक बॉक्स मागवले आहेत. हे रुपये मोजण्यासाठी आतापर्यंत 6 मशिन आणण्यात आल्या असून बँकांकडून पीएसी आणि पोलीस दल (Police force) घटनास्थळी हजर आहे.