धारुर ते केज एसटी तब्बल एक महिन्यानंतर धावली; प्रवाशांत समाधान.

किल्लेधारूर दि.5 डिसेंबर – येथील आगारातील एसटी कर्मचाऱ्यांचा (ST employees strike) संप 6 नोव्हेंबर पासून सुरु आहे. यातच आज आनंदाची बाब म्हणजे तब्बल एक महिन्यानंतर येथील बसस्थानकातून केजकडे बस धावली. यामुळे प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.
(Dharur to Kaij ST ran a staggering one month later; Passenger satisfaction.)
धारुर (Dharur) आगारातील कर्मचारी संपात सहभागी असल्यामुळे गेल्या महिनाभरापासून प्रवासी वाहतुक ठप्प आहे. दि.6 नोव्हेंबर दुपारपासून बस (ST Bus) सेवा बंद आहे. आगारातील 278 पैकी आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षक वगळून सर्वच कर्मचारी संपावर होते. विलिनीकरणाची मागणी मान्य झाल्याशिवाय संपातून माघार घेणार नसल्याचा पावित्रा कर्मचाऱ्यांनी घेतलेला आहे.
मात्र राज्य शासनाने संपातून तोडगा काढण्यासाठी वेतन वाढ दिल्यानंतर राज्यात काही ठिकाणी कर्मचारी कामावर परतत असल्याचे दिसून आले. धारुर आगारातील यांत्रिकी विभागातील जवळजवळ तीस कर्मचारी, एक वाहक व चालक कामावर परतले. दरम्यान आगारातील 65 कर्मचाऱ्यांचे निलंबन (suspension) करण्यात आल्याचे कळते.
यातच आज दि.5 डिसेंबर रोजी धारुर बस स्थानकातून केजसाठी तब्बल एक महिन्यानंतर बस धावली. याबाबत धारुर आगाराचे व्यवस्थापक शंकर स्वामी यांच्याशी संपर्क केला असता आगारातील यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांसह एक चालक व वाहक कामावर रुजू झाल्यामुळे आज केजसाठी (Kaij) बस सेवा सुरु केल्याचे सांगितले. या बसमध्ये अनेक प्रवाशांनी प्रवास केला असून दोन फेऱ्या झाल्याची माहिती दिली.
परंतू अद्याप मोठ्या प्रमाणात कर्मचारी संपावर असल्याने ही बस सेवा किती काळ सुरु राहिल हा प्रश्नच आहे. दरम्यान, खाजगी प्रवासी वाहतूकीला वैतागलेल्या प्रवाशी (Passenger) वर्गातून केजसाठी बस सुरु झाल्यामुळे समाधान व्यक्त करत असून लवकरच सर्व मार्गावरीला बससेवा सुरु व्हावी अशी अपेक्षा करत आहेत.