
किल्लेधारूर दि.२२(वार्ताहर) गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात सुरु असलेल्या धारुरमध्ये एक कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या अफवेला अखेर आज पुर्णविराम मिळाला असुन त्या रुग्णाचा अहवाल ही निगेटीव्ह आला असल्याचे डॉ. सचिन शेकडे यांनी दुरध्वनीवरुन सांगितले.
शहरात काल एका रुग्णास कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची अफवा शहर व तालुक्यात झपाट्याने पसरली होती. येथील ग्रामीण रुग्णालयातुन सदरील रुग्णाच्या नाक व घशातील अंशाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. या नमुन्याचा अहवाल आज सकाळी प्राप्त झाला असुन तो निगेटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली. यापुर्वीही शहर व तालुक्यातील ६ संशयितांचे स्वॕब नमुने तपासणीस पाठवण्यात आली होती. ती सर्व नमुने निगेटिव्ह आलेली आहेत. तालुका आरोग्य विभाग कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असून परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.सचिन शेकडे यांनी दिली.