कोरोंना विशेष
धारुर सुरक्षित; जिल्ह्यात ३४ पॉझिटीव्हची भर

बीडः रात्री एक वाजता आलेल्या अहवालात बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांचा आकडा आज ३४ ने वाढला आहे. आजच्या अहवालात धारुर शहरात अद्याप तरी समुह संसर्ग नसल्याचे दिसत असून शहरातील सर्व अहवाल निगेटिव्ह आली आहेत.
रात्री एक वाजता आलेल्या अहवालानुसार बीड शहरात ११ तर परळी तालुक्यातील १०, अंबाजोगाई शहरात ५ तर गेवराईमध्ये ६ पॉझिटीव्ह आढळली आहेत. याशिवाय माजलगावात २ नवीन रुग्ण आढळून आली आहेत. यात तब्बल २२ जन पॉझिटीव्ह रुग्णाच्या सहवासित किंवा संपर्कातील तर १२ रुग्ण नवीन आहेत. आजच्या अहवालात २० पुरुष तर १४ महिला संक्रमित आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रुग्णांचा आकड्यात मोठ्या प्रमाणात समुह संसर्ग आढळून येत असून धारुर तालुका यातून बचावल्याने रुग्ण संख्या आटोक्यात आहे.