जनरल स्टोअर व्यापाऱ्यांची मुख्याधिकारीकडे धाव
लॉकडाऊन मुळे व्यापारी हतबल

किल्लेधारूर दि.२८(वार्ताहर) शहरातील जनरल स्टोअर्स व्यवसायिकांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सुहास हजारे यांच्याकडे धाव घेत वैध कालावधी संपणाऱ्या वस्तूं विक्री करण्यासाठी दुकाने उघडण्याची परवानगी मागितली आहे.
शहरात अनेक जनरल स्टोअरधारक व्यापारी आहेत. गेल्या पस्तीस दिवसांपासुन सुरु असलेल्या लॉकडाऊन मुळे जनरल स्टोअर दुकानातील अनेक वैध कालावधी असलेल्या वस्तू खराब होवून व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसु शकतो. शिवाय विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सर्व शालेय साहित्याची मागणी असतानाही विक्री करता येत नाही. यासर्व बाबीचा विचार करुन प्रशासनाने जनरल स्टोअर्स व्यापाऱ्यांची दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नायब तहसीलदार तथा प्रभारी मुख्याधिकारी सुहास हजारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी व्यापारी सुर्यपाल तोष्णीवाल, राजेश चिद्रवार, सुनिल खिंडरे, विलास पाथरकर, अरुणा पिलाजी, नितिन मंत्री, शिवा शेटे, आसाराम भाळस्कर, सचिन चिद्रवार, गोविंद शेटे, मुरलीधर कवठेकर आदी उपस्थित होते.