आमदार प्रकाश सोळंके यांना कोरोनाची लागण; काळजी घेण्याचे केले आवाहन.

माजलगाव दि.9 एप्रिल – माजलगाव मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाशदादा सोळंके यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली असून त्यांनी आपली प्रकृती उत्तम असुन मतदारसंघातील जनतेने काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती जि.प. चे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांनी दिली.

(Prakash Solanke infected with corona; Appeal to take care.)

गेल्या काही दिवसांपासून आ. प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) मुंबईत होते. काल पुणे येथे निवासस्थानी परतल्यानंतर चणचण वाटत असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी कोविड तपासणीत त्यांचा कोविड अहवाल पॉझिटीव्ह (Corona Positive) आला. पुणे येथील खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असुन त्यांनी आपली प्रकृती उत्तम असून मतदारसंघातील जनतेने कोरोना बाबत सतर्कता बाळगुन काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाशदादा सोळंके (Prakash Solanke) यांनी दोन दिवसांपुर्वीच मुंबई येथे मतदारसंघातील सिंचन प्रकल्पाबाबत मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली होती. तर आज दि.9 रोजी माजलगाव मतदारसंघात माजलगाव, वडवणी व किल्लेधारूर येथील पंचायत समिती कार्यालयात आढावा बैठका ठेवण्यात आल्या होत्या.

आ.प्रकाशदादा सोळंके यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!