रोहित पवारांच्या हृदयस्पर्शी पोस्टने जिंकली अनेकांची मनं….

मुंबईः दि.१८- राजकीय जीवनात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कुटूंबातील आपल्या जीवलग नातलगांनाही भेटीसाठी वेळ मिळत नसतो. त्यातल्या त्यात स्वतःच्या लेकराबाळांना बाप म्हणून प्रेम देण्यात व त्यांचे बालहट्ट पुरवण्यात कमी पडतोत. अशीच एक पोस्ट काल रोहित पवार (Rohit Pawar) यांनी ट्विट केली. आपल्या मुलांच्या अनेक दिवसानंतर झालेल्या भेटीनंतर त्याचा बालहट्ट पुरवण्यासाठी त्यांना काय करावं लागलं ही ती पोस्ट. सध्या ही पोस्ट सोशल मेडियात (Social Media) अनेकांची मनं जिंकत आहे.
जीवनात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या कुटूंबासाठी आपली जबाबदारी पार पाडत असतो. त्यात लहान बालकांच्या गरजा पुर्ण करत असताना त्यांचा बालहट्ट पुरवण्याची कसब प्रत्येक आई वडील करत असतो. एखादा व्यवसायिक अथवा राजकीय क्षेत्रात अतिव्यस्त व्यक्ती आपल्या लेकरांचा बालहट्ट कसा पुर्ण करतो याची प्रचिती रोहित पवारांच्या सोशल मेडियात (Social Media) व्हायरल झालेली पोस्ट सांगून जाते. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युथ आयकॉन ठरलेले रोहित पवार सध्या अख्ख्या महाराष्ट्रात दौरा करत आहेत. कधी पहाटे बाजार समितीत, कधी एखाद्या छोट्या चहा स्टॉल वर तर कधी एखाद्या सामान्य चपला शिवणकाम करणाऱ्या जवळ जावून आस्थेवाईक पणे विचारपूस करणारे रोहित पवार (Rohit Pawar) एक वडिल म्हणून पहिल्यांदाच बघायला मिळाले. त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते सांगतात… दररोजच्या व्यस्त दिनक्रमामुळे मुलांना वेळ देता येत नाही, पण आज बऱ्याच दिवसांनी शिवांशला वेळ दिला. “बाबा किती दिवसांपासून मला भेटला नाहीत तुम्ही” असं म्हणतं माझ्यासोबत केस कापण्यासाठी जाण्याचा हट्ट त्याने केला, अर्थात तो पुर्ण करण्यासाठी माझ्याकडे पर्यायच नव्हता… अशी ती हृदयस्पर्शी पोस्ट अनेकांची मनं जिंकत आहे.