धारुर तालुक्यात युवकाची आत्महत्या; बीड जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरुच.

किल्ले धारूर दि.7 जुन – धारुर तालुक्यात सोमवारी रात्री एका युवकाने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. काल बीड (Beed) जिल्ह्यात एकाच दिवसांत चार जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. यात वाढ होवून जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
सोमवार दि.6 जुन रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान तालुक्यातील मैंदवाडी येथे युवकाने आत्महत्या केली. राहत्या घरी असलेल्या किराणा दुकानात नशेच्या धुंदीत महारुद्र सिताराम तिडके या पस्तीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पहाटे सहाच्या दरम्यान मयत तरुणाचे पार्थिव शवविच्छेदन करण्यासाठी धारुर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. घटनास्थळी पो.कॉ. संजय गुंड दाखल झाले असून पोलिस (Police) पंचनामा सुरु आहे.
बीड जिल्ह्यात आत्महत्यांचे सत्र सुरुच असून मराठवाड्यात सर्वाधिक आत्महत्या बीड जिल्ह्यात होत असल्याचे दिसून येत आहेत. वेगवेगळ्या कारणांने होत असलेल्या आत्महत्या सध्या चिंतेचा विषय ठरत आहे. बीड जिल्ह्यात मागिल दोन दिवसात चार आत्महत्या समोर आल्या आहेत. बीड तालुक्यात दोन तर गेवराई व माजलगाव तालुक्यात प्रत्येकी एक आत्महत्या नोंद झाली आहे. यात धारुर (Dharur) तालुक्यातील तरुणाच्या आत्महत्याची भर पडली आहे.
( Youth commits suicide in Dharur taluka; Suicide season continues in Beed district. )