धारुर तालुक्यातील सि.आय.एस.एफ. जवानास विर मरण…. आज होणार मुळगावी अंत्यसंस्कार

किल्लेधारूर दि.22 मार्च – तालूक्यातील हिंगणी ब्रुद्रुक येथील केंद्रिय औद्योगीक सुरक्षा बल सेवेतील जवान गजानन त्र्यंबक सोंळके हा नागपूर येथे देशसेवा करत असताना अचानक आजारी पडल्याने काल दि.21 मार्च रोजी त्याला कर्तव्यावर असताना विरमरण आले. त्यांचे पार्थीवावर आज सोमवारी सकाळी हिंगणी ब्रुद्रुक ता.धारुर (Dharur) येथे शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

(CISF in Dharur taluka Jawanas Veer Maran …. Mulgaon funeral will be held today)

तालूक्यातील हिंगणी ब्रुद्रुक गजानन त्र्यंबक सोंळके यांची 2008 केंद्रीय औद्योगिक सुरक्षा (CISF) बलात निवड झाली. त्यांनी तेरा वर्ष देशसेवा केली. सध्या नागपूर (Nagpur) येथे सेवेत कर्तव्य बजावत असताना अचानक आजारी पडला. यामुळे नागपुर (Nagpur) येथे रुग्णालायात उपचार घेत असताना 21 मार्च रोजी त्यांचे निधन झाले. त्यांने गेल्या तेरा वर्षापासून देशसेवा करुन अखेर कर्तव्य बजावत असतानाच विरमरण आले.

आज दि. 22 मार्च रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजता हिंगणी ब्रुद्रुक येथे शासकीय इतमामात त्यांचे पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे पश्चात पत्नी, आई, वडील व तीन भाऊ असा परिवार आहे. जवान गजानन सोंळके यांचे निधान मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
error: Content is protected !!